अगं तूच सांग ना…..

पाहून तुला पहिल्या नजरेत,

येडं लागलं या मनाला

अगं तुच सांग ..,

काय झालंय माझ्या मनाला..?

 

प्रत्येक वेळेस तुझ्या सुंदर डोळ्यात,

एक वेगळीच चमक दिसायची

बेभाण व्हायचो मी,

जेव्हा तू मन भरून हसायची

 

तुझ्या त्या एका बिंदीने,

तू खूप सुंदर दिसायची

ती एक केसाची बट,

त्यात अजूनच भर घालायची

 

तुझ्या बोलण्यातला प्रत्येक शब्द,

मी नेहमी जपून ठेवायचो

प्रत्येक वेळेस फक्त तुला

तुलाच बघत बसायचो 

 

लोक म्हणत होते,

ती गोष्ट खोटी वाटत असायची

आज कळून आलंय मला,

चंद्रापेक्षा नेहमी तुच सुंदर दिसायची

 

नजरे समोर आली की,

हृदयाचे ठोके वाढायची

आजुबाजूला एवढा गोंधळ असून,

माझी नजर फक्त तुझ्यावरच थांबायची

 

नजरे आड असताना,

तुझ्या सोबतचे आनंदाचे क्षण आठवायचो 

तुझ्या फक्त एका भेटीसाठी,

मी तास न तास वाट बघत बसायचो

 

उठताना, बसताना, प्रत्येक क्षणाला

तू माझ्या सोबत असण्याचा भास होतो

पण तुला प्रत्यक्षात नजरे समोर बघून,

दिवस माझा खूप खास होतो

 

माझ्या मनाची अवस्था,

कशी कळेल तुला

तुझ्या मनात काय घडतंय,

कस कळेल मला

 

काय करावं, काय नाही, काही कळेना,

जणू छंद तुझा लागला मनाला.. 

अगं आता, तुच सांग मला

खरंच, काय झालंय माझ्या मनाला….?

 

तुषार रडके

– तुषार अ. रडके 

मूर्तिजापूर, अकोला.

भ्रमणध्वनी – 73595 94378

1 thought on “अगं तूच सांग ना…..”

  1. Pingback: साहित्यामूलाग्र मासिक अंक ऑगस्ट - २०२६ - साहित्यामूलाग्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top