पाऊस आटलेला

आज असा कसा हा पाऊस आटलेला

नजरेत प्रत्येकाच्या तो थेंब साठलेला

कुठे शब्द ते गेले घन ओथंबुन येती

मेघ प्रतिक्षेच्या विरहात राही माती

पाणी हेच जीवन पण फिरवी दाही दिशा

दोष कुणाचा हा का व्हावी करुण दशा

हा दोष मानवाचा की भेद निसर्गाचा

विज्ञाननिष्ठ आम्ही तरी काळ प्रकोपाचा

निसर्ग सृष्टीचा दाता संवर्धन त्याचे करा

ही आर्त वसुंधरेची जागे व्हा जरा

जागे व्हा जरा….

 

  –  सुनील ढोकणे

       मूर्तिजापूर – अकोला 

    भ्रमणध्वनी – 8275296546 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top