अनपोज

गाव म्हटलं की बारा भानगळी आल्याच. एखादा माणूस भानगळ होत. तवा थ्यो काय मामुली माणूस नायी, नेता हाय, प्रधान पदाचा आमच्या गावासाठी बरं. नायीतं समाजासाठी देशासाठी. थ्यो कायी नेत्यावानी बगळ्यासारखे पांढरे कपडे घालत नायी, खिशाले बिल्ला ठोकून पहाडी आवाजात माईक फुटेपर्यंत बोलत नायी. त्याची फक्त आमच्या गावातच चालते.

रम्या म्हणजे त्याची उंचाई जरा कमीच हाय, बायकोपरिस हितभर ठेंगणास हाय. दाढीच्या फनकटातून कवानायी फिरवत, नायी पत्त. गंजीपत्त्याच्या डावात कवाबी मागते सत्त. नाकाडोयात जरा डावाच हाय. अंगात सदरा हाय, खालच्या दोन गुंड्या उघडल्या हायत, वरची गुंडीची जागा धाग्याने घेतली. फुलपँट घालते पण पयजाम्यावानी घालते. समंधी कापळ चूलीवरल्या गंजावानी केली, पायात हाय टायरी तिच्यात एकाचा आंगोठा जरा सुदा हाय, दुसऱ्या पायाचा आंगोठा बोटाखालीच बारमाही असते. बोलायच्या वक्ती च… क… करून गोठ सुरू करते, ज्याची जान नायी त्यात तोंड खुपते, लायण्या लेकरावाणी रस्त्यान फुटाने फाकते.

            पयले तुम्हाले त्याच्या लग्नाची गोठ सांगतो. याले पाहाले आले पावने. जेवण खावन झाली, मग पोराची इचारपूस चालू झाली. तवा पुठ्ठा असा ऐटीत बसला की, पोरीच्या बापाच्या पाठीवर लातीचा हानला रट्टा. एका पाव्हण्यानं विचारलं नाव. पठ्ठ्यानं काय केलं. पयले आपलं नाव न सांगता बापाचं सांगलं, बापाच्या जागी आपलं नाव घातलं. नाव आयकून पाव्हण्याचे कान फटफटले. तरी बीन पाव्हण्यानं स्वीकारूआकरपान अटपलं. लग्नाच्या दिशी नवरीन घातला याच्या गयात हार मंग लागली पाया. तसा भाउनबी तिच्या गयात हार घातला. नमस्कार घालाले खाली वाकला तसा त्याले नवरीनं पाय घसरल्या सारखं करून त्याले चेंडूवानी…वर घेतला. असं समंध घडल ; पण बायी बेजा हिंमतबाज! त्याला आनल जाग्यावर एक दोन कच्ची बछी झाली, संसार साजरा सुरू झाला; पण टीव्हीवर लालू प्रसादले पाहून गळ्याले नेता बनाचा हिवताप आला. मग त्या हिवतापाची उपाययोजना झाली सुरू. गल्लीतून दिल्लीत जीकन असनं तं मग पयले गल्लीत जीका लागलं, मग गावातून सरपंच पदाले भरला फार्म आपण अनपोजच येऊ, मुन लोकाईलेस दम भरला.

फार्म मांगं घेणार नायी, म्हणून म्हसीच्या पाठीवर हात ठेऊन परतीज्ञा घेतली. आपल्याले सरपंचापासून मुख्यमंत्री बनाचं, या वाक्याचा परतीज्ञेले जोळ भरला. मसीनं बी दुधाचा आट सोडला.

फार्म भरले जवा गेला तालुक्यातले तवा तहसीलदार म्हणे लावा सई तवा पठ्ठ्या म्हणे, साहेब, आपल्या सात पिडयात कवा, दोन पैशाचा खर्च शायेवर नायी केला. आपलात हाय सरकारी ठसा म्हणजे अंगठा, तहसीलदार गडयाकडे पाहातच राह्यला. प्रचाराच्या दिवसात गडयाचा लय माहोल राह्यला – बारा बैलासारखे सोबती घेऊन हिंडे, आपण अनपोज हायो म्हणून ऐटीतच हिंडे,आल्या गेल्याले चापानी पाजे ऽ ऽ नायीत दाखवे सोप सुपारीचा धूप आपल्यात वार्डात

आपल्याले कायी हिडायचं कामच नायी, मग दुसऱ्याचं वार्डात हिंडे, त्यातनीच प्रचार करे. लोक मोठे हुशार कोनी च्यापानी काळे, कोणी काही बलावे, कोनी त्यांच्या घरची दाय जवारी मांगे. तसा मोठ्या मनानं त्याइले मांगन ते दे. बायकोच्या बोलण्याने गडी जरा ना हाले. विरोधी पक्षावाला दिसला की छाती काळून चाले. वार्डातल्या लोकाईसंग जवातवा भांडे. बायको जरा जास्त बोलली तिले तिसऱ्या दिवसी कांडे. जे व्हायचं तेच झालं. पयल्यास फेरीत त्याचं डिपॉझिट गोल झालं. याले नोता इतिहास माहीत ना भुगोल माहीत. ना

वर्तमानावर याची नजर होती, भूतकाळाची नाही याले जाण, हे समंध लोकाईनं हेरलं अन् राम्याचं पत्तं फाडलं.

दिल्लीत कायी होत असन; पण गल्लीत तस नायी घडलं. आपण गल्ली सुदी ठुलीत दिल्ली घडणं. हे माह्या गावानं जाणलं. राम्याचं पितय उघळ पाडलं. तवापासून; त्यानं राजकारण सोडलं, तसं संसार करणं धरलं, पोट्ट्याले पयले शायेतनी टाकलं. पण त्याचं सरपंचाचं स्वप्न मातीतच मुरलं. बापाचं मातीत मुरलेलं बापाच सपन पोरानं पुढे त्या मातीतनंच अंकुरलं… गाव घडलं.

सल्लागार मंडळ सदस्य श्रीकृष्ण शामसुंदर

– प्रा. श्रीकृष्ण श्यामसुंदर 

भ्रमणध्वनी – 9284484279

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top