शांती नव्हती भिक्षूंच्या चित्ताला
वनात मिळाले ध्यानासाठी आलंबन
सहन न होऊन कंटाळले त्रासाला
चित्त अशांत असल्याने केले पलायन
गौतम बुद्ध यांनी मेत्तसुत्त द्वारे दिले संरक्षण
अनाथ पिंडकाच्या मठात जागा होती जेतवन
शीलाचे काटेकोरपणे करण्याचे आहे वचन
मेत्तसुत्त म्हटल्याने शांत होते मन
आई मुला बद्दल बाळगले सद्भाव
तसा ठेवला पाहिजे सर्वांप्रति समभाव
ज्ञानाचा राहत नाही अभाव
मेत्तसुत्त म्हटल्यामुळे बदलतो स्वभाव
वाढते मना मध्ये करुणा
बुद्धांच्या शिकवणीचा आहे कणा
सर्वांच्या पूर्ण होतात कामना
करणीय मेत्तसुत्त आहे विश्व प्रार्थना
-डॉ रोहित तळवलकर
मुंबई