रुसवा

चांदण्यांची रात सखे आज आली

रुसवा सोड आता स्मित कर गाली !

तुझ्या जागृतीने स्फृती मला मिळे

माझ्या नयनात तुझे प्रतिबिंब खेळे

नको हा बहाणा अशा शुभ वेळीं !

वेलीही हसतात गळ्यात घालुनी गळा

गोठ्यातील गाय लावी वासरास लळा

तुलाच कशी सखे झोप ती आली !

सूर्य ही झोपला मातीच्या कुशीत

चंद्र तारे सारे देतात ते साक्ष

घेणा सखे मला तुझ्या पदराच्या खाली !

रुसवा सोड आता स्मित कर गाली….

संपादकीय मंडळ सदस्य - सुभाष पुंडलिक डहाणे

सुभाष पुं. डहाणे माळशेलू (वाशीम)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top