घरपण

उंबरठा ओलांडताना होती एक चाहूल,

नवं जीवन माझं असावे सुंदर.

ही नव्हती आस फक्त एका जीवाची,

होता तो रिमझिम पाऊस दोन्ही घाटांवरती.

 

मन तिचं, मन त्याचं वादळात हुंदके खात,

शोधत होतं एक शांत छप्पर.

नाव त्याचे मैत्री,

आणि दोघे आले त्या छताखाली.

 

नदीरूपी आयुष्याच्या प्रवासामध्ये,

कधी असेल वसंताचा बहर,

तर कधी लागेल वादळांची चाहूल.

पण त्या दोन जीवांच्या नात्यामधील

असलेले मैत्रीरूपी ते छप्पर

टिकवेल घरपण,

जे बहरेल जीवन.

आनंद मोकल मराठी कवी आहेत.

– आनंद मोकल 

छत्रपती संभाजीनगर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top