महामानव

सूर्यतेजाला लाजविणारे रत्न भिमाई पोटी जन्माला आले

लखलखत्या तेजाने १४ एप्रिल न्हाऊन निघाले. 

लक्ष लक्ष मानवाचा उध्दार करणारा महामानव जन्माला

आणि सर्व जगाचा उद्धार झाला 

अन्याय, अज्ञान,अत्याचारला तोंड देण्या अवतार झाला. 

न्याय, स्वातंत्र्य, समता, स्त्री शिक्षणाचा लढा दिला. 

दिले जगाला एवढे मोजता येत नाही. 

माहीत नव्हते आम्हाला हक्क,

माहीत नव्हते अधिकार,

अन्यायाने पिचलेला होता समाज. 

बाबासाहेबांनी लिहिले संविधान

सर्वांचे आयुष्य निघाले उजळून

लेखनीच्या उपकाराची परतफेड करणे शक्य नाही.

असा महामानव पुन्हा पुन्हा होणे नाही

करुया लोकशाहीच्या लेखनीचा सण साजरा

महामानवला मानाचा मुजरा…. 

- कांचन मिसाळ(तिडके)     मूर्तिजापूर (अकोला)

– कांचन मिसाळ (तिडके)

मूर्तिजापूर 

3 thoughts on “महामानव”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top