स्त्री सशक्तीकरण आणि आंबेडकरी विचार

स्त्रीचे होत होते शोषण 

बाबासाहेबांनी केले यावर चिंतन 

स्त्री वर्गाला दिले शिक्षण 

पटवून दिले स्री आहे भूषण 

 

स्त्रीला सोडवले अनिष्ट प्रथांपासून

मिळवून दिले तिला अधिकार 

प्रगती होत नाही शिक्षणावाचून 

परिस्थितीसमोर मानली नाही हार 

 

स्त्रीला मिळवून दिले वेतन 

प्रस्तुती रजा घेण्याचा पूर्ण केला हट्ट

होऊ दिले नाही पतन 

मतदान करण्याचा दिला हक्क 

 

स्त्री जातीचा केला उद्धार 

संपत्ती बाळगण्याचा नव्हता अधिकार

उघडून दिले प्रगतीचे दार 

पुनर्विवाहाचा मनात रुजवला विचार 

स्त्री जीवन झाले सुखकर

स्त्री वर्गाला मिळतो आदर 

या पाठी आहेत आंबेडकर 

मनापासुन जोडले जातात कर

– रोहित तळवलकर

मुंबई 

1 thought on “स्त्री सशक्तीकरण आणि आंबेडकरी विचार”

  1. Dr.Manisha Yadav

    आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या कार्याचा(१९२८ते १९५६ )पर्यंतचा काळ अप्रतिम पद्धतीने कवितेत शब्दबद्ध केला
    यामुळेच महिलांचे सक्षमीकरण पुढील काळात घडून आले

    खूपच छान कविता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top