भीमघोष

नाच गाणे जोश

जयंतीच्या उत्साहात

भीमघोष नादे

साऱ्या विश्वमंडलात

क्षुद्र म्हणणारे

गेले स्वयं रुबाबात

भीमशक्ती बळ

भिणले रोमरोमांत

लुटमारीतूनी

कुणी होईल श्रीमंत

विद्वान ठराया

हवा भीम जातीवंत

भीमावाणी नाही

कुणी आख्या दुनियेत

घर वाऱ्यावरी

आणि इतराचे हित

जन्मेल का कधी

भीमासम प्रज्ञावंत

भूक आगडोंब

परी चित्त अभ्यासात

जडजवाहिरे

कुलुपात … तिजोरीत …

भीमाचा प्रकाश

राही जगा उजळत

-तुकाराम पुंडलिक खिल्लारे

 – तुकाराम पुंडलिक खिल्लारे

  परभणी 

  भ्रमणध्वनी : ८८३०५९९६७५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top