बाप आपला सूर्य असुन….
का? बसला हिरमुसून
कसं चालेल मित्रा निराश बसून
बाप आपला सूर्य असून
उठ काढ संविधान…
पुस्तकात पाय डोकावून…
वाच जरासांक जीव तोडून
बाप आपला सूर्य असून….
करू नको कायद्याचं उल्लंघन
कायद्याने बांधलं जातीयतेला बंधन…
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर भेटेल
पहा जरा संविधान उघडुनं…..
बाप आपला सूर्य असुनं…..
बाप आपला सूर्य असुनं…..