तुझ्या नि माझ्या अस्तित्वाची भीम जयंती …..
करू साजरी त्या सूर्याची भीम जयंती …..
तुज जन्माने जन्म आमचा झाला आहे
जन्मोजन्मी उपकारांची भीम जयंती …..
वामन वानी भल्या पहाटे सूर ऐकता
गजबजते मग चिल्यापिल्यांची भीम जयंती …..
युगांयुगांनी बरबटलेल्या द्रारिद्र्यावर
अमीर होते कफल्लकांची भीम जयंती…..
हिरवा भगवा निळा पांढरा रंग न कुठला
समानतेच्या उपासकांची भीम जयंती…..
महापुरुषांच्या त्या प्रतिमा हृदयी लावू
वाटावी मग विद्वानांची भीम जयंती
पिढ्यांपिढ्या फिटेल न अता ऋण भीमाचे
मिलिंद करतो त्या बापाची भीम जयंती…..
मिलिंद अवचित इंगळे
मूर्तिजापूर
मो.८८०६७०२४९९
छान