तनया

काळजाचा तुकडा माझा 

 पापनीची झालर बाई,

 भावनेचा कंठ माझा 

 मायेचा पाझर बाई.

 छान दिसते छकुली 

 जशी छान बाहुली ग,

 घ्यावे कवेत तिला 

 वाटे रोज मला बाई.

 बोले बोल बोबडे ती

 चाले कधी दुडूदुडू,

 पाहे ती टुकू टुकू 

 हसे ती खुदु खुदु.

 बाबा तिचा रोज म्हणे 

 नको रोज वाढू बाई,

 पाहे वाट रोज माझी 

 आले का अजून नाही. 

 झोप मात्र तिला नाही 

 जरी थापटे रे आई,

 माझे बाबा, माझे बाबा 

 हाचि तीचा मंत्र सदा, 

 स्वर्ग दार तीचे माझे 

 जसा देव तिचा बाई.

 कसा क्षण आला आज 

 हुंदक्याला दम नाही.

 पारखं झालं पिल्लू 

 घरट मोडलं बाई,

 सासरी जवा गेली 

 माहेर तीर्थ झालं.

 पीशी झाली माझी बाई 

 बाईची ती झाली आई.

राजेश नाकट

राजेश जानराव नाकट
भ्रमणध्वनी -९७६३६०३३१२ 

1 thought on “तनया”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top