फेस

फेस बाई फेस, साबूचा फेस,

घेतला बाई त्याने, बुडबुड्याचा वेश.

पांढरा शुभ्र पदर घेऊन,

इंद्रधनुष्याची सुरेख बुट्टी लेवून,

वरवर तरंगत जाईल,

हवेच्या स्पर्शाने विरून जाईल.

ही सारी गंमत भारी,

मुलांना मिळाली, जादूई परी.

जादूच्या कांडीने, उडवी फुग्यांच्या रांगा,

त्यांच्याशी खेळण्या, मुले करतील दंगा.

आकारांशी त्यांच्या, मुले खेळती हळुवार,

टिचकी लागताच उडती पाण्याचे तुषार.

मुलांची मग खुलते कळी,

पांढऱ्या शुभ्र फेसाची गंमत न्यारी.

प्रा. मोक्षदा विजय बेलखेडे

 – मोक्षदा विजय बेलखेडे 

2 thoughts on “फेस”

  1. Shrikrishna Shamsundar

    बालगीत छान आहे. लय आणि ताल याचा मिलाफ आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top