सजवून लाल केले काळीज खंजिराने
केलेय हृदय तुजला स्वाधीन खंजिराने
मारायचे तुला जर छातीत मार माझ्या
मारु नकोस केव्हा पाठीत खंजिराने
प्रतिमा तुझीच होती हृदयात ठेवलेली
केले असेल बहुधा खारीज खंजिराने
हा वाद संपत्तीचा मिटणार ना कधी ही
एकेक खत्म केले,वारीस खंजिराने
जिंकायचे तुला जर, प्रेमात जिंक मजला
होणार ना कधी मी, काबीज खंजिराने
मज जन्मभर कुणी ना भेटावयास आले
मयतीत आज केले सामील खंजिराने
मिलिंद इंगळे (कविराज)
मुर्तिजापूर
संपर्क:- ८४८५८६१६२०
मस्त.