आरोप

 का हो मिस्टर पतीराज माझे ! 

 दोघेही आपण कामावर जातो 

 वेळ ही दोघांचा सारखाच असतो 

 मग मीच सारे काम का करावे ?

 मी जसा तुमच्या हातात चहा ठेवते 

 तसाच तुम्ही मला का नाही द्यावे ?

 तुम्ही फक्त सकाळी चहाचे फुरके मारून बातम्या बघून पेपर वाचावे..

 मी मात्र सकाळच्या झाड झुडी पासून

 तुमच्या हातात रुमाल व बॅग घेईपर्यंत मीच सारे का करावे! 

 काम करता करता माझा ही वेळ होतो 

 आणि माझा नाश्ता तसाच टेबलावर पडून राहतो !

 सर्वांना खास भरवता भरवता वेळेअभावी माझ्या तोंडात पाण्याचा थेंबही पडत नाही!

 लंच टाईम मध्ये ऑफिसचे फोन रिंग दहा वेळा उठविल्याशिवाय राहत नाही…

 एवढे सारे करूनही भाजीत मीठ कमी पडले म्हणून माझ्यावर तुम्ही जोरात ओरडावे!

आणि तुझं घरात लक्षच नाही, असे ठामपने म्हणावे ! 

 एका क्षणात हे वाक्य वापरता…

 माझ्या घराला मीच जपणार हे माहीत असूनही माझ्यावर पटकन आरोप लावता ! शब्दांचा मारा करताना थोडा तरी विचार माझ्या मनाचा ! 

 एका क्षणात चूराळा करून टाकता माझ्या भावनांचा…

मुलांकरिता रात्र – रात्र काढली डोळ्यात…

डोक्यावरची पट्टी बदलवता बदलवता सूर्यनारायण कधी निघतो  कळत सुद्धा नाही…

 तरीही सकाळी सातलाच कप बशी समोर ठेवली जाते या सर्वांपासून तुम्ही अननोन असता…

का!….. का हे सारे! 

 तुमच्यावर जबाबदारी नाही ?

 तुमच्यासारखा आराम करणे, चहा पिणे मला नाही का वाटत ! 

 वाटते ना पण… पण आम्हा स्त्रियांची किंमत कोणाला!….🤔

 ना माहेरी, ना सासरी, ना समाजात अनगीनत वेदना सहन करून ज्याला जन्म देते तोही मजबूर करतो पुढे जाण्यास आश्रमात 😔😔

कवयित्री छाया चक्रनारायण

– छाया चक्रनारायण

मूर्तिजापूर 

1 thought on “आरोप”

  1. Manisha Yadav

    स्त्रीमुक्ती संकल्पना किती मर्यादित? हे कवितेतून जाणवले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top