वाटतो जीवाला धाक रात्री- बेरात्री
माणसे झोपलेली असताना
कधी काय कानावर वाईट पडण्याचा
बापाच्या जीवाला वेगळीच फिकीर
पीक येईल की करपेल पाण्यावाचून म्हणून
लोकं सदैव असतात धास्तावलेली
कधी काय घडेल सांगता येत नाही म्हणून
आता तर भर दिवसा होताहेत खून तर कधी बलात्कार
पोरींचा बाप तर नेहमी चिंताग्रस्त जगतोय,आपल्यावर ही वाईट, वकटी वेळ येऊ नये म्हणून
देतोय रात्रंदिवस पाहारा
आपल्या माय-बहिणीच्या संरक्षणासाठी
मधात अडथळा नको म्हणून घेतला जातोय जीव त्याचाबी
भरदिवसा घडू लागलीत अत्याचारं
निवडून दिलेली लोकच करताहेत
सांभाळ बलात्काऱ्याचा
घेताहेत त्यांची बाजू,आपलं पितळ उघडं होऊ नये म्हणून
यासाठी
माणसं मरताहेत,मारली जाताहेत याची कोणालाही दिसत नाही पर्वा
परवा तर म्हणे एस टी बसमधेच झाला बलात्कार
कोणास ठाऊक लक्ष विचलित करण्यासाठी
एका मुलीच्या शरीराची उडविली असेल लक्तरे आपल्या सोयीसाठी
आता तर वाटू लागली धास्ती
समाजात जगण्याची,फिरण्याची अन अवतीभवती काही घडण्याची…
– डॉ. दैवत सावंत
संभाजीनगर