सौंदर्याच्या मोहिवनात मन अमुचेही डोले
होउनी बंधनाचे बंधन शिथिल
मन प्राप्तीसाठी बोले
त्या प्राप्तीमध्ये न येते ध्यान कुणाचे,
कितीही पढो पुस्तके, कितीही असा गुणाचे!
होउनी राजा इंद्रियांचा मन
बुद्धी दास्य पत्करी
मन काढी नकाशा त्याच्यामधी
बुद्धी अस्तित्व चित्कारी.
भान कसले मग खाणे-पिणे
जेव्हा बेधुंद होऊनी फिरते मागे
सौंदर्याने पहावे डोकून (मागे)
मग काय सांगावे हृदय ठोके.
लोचनात सौंदर्याच्या जग
विस्तारल्यागत वाटे
तेच काय पाणे जीवन ध्येय
म्हणुनी मीच मनाला डाटे.
मी न करावी चूक ऐसी
ज्याने सौंदर्य रुसावे
मी करावी तैसी नक्कल
ज्याने सौंदर्य हसावे.
हसण्याने सौंदर्याच्या
मन चैतन्यास भरती येते
कसे सांगावे तत्क्षणी
‘सिकंदर’ चरणी लोळण घेते.
त्याच विश्वासाने मला
चिळीचेही धाडस होते
म्हणता-म्हणता अन् बोलता-बोलता
अडवण्याचेही साहस होते.
मग प्रेम जुळणीचे रंग काही
दिसण्यास वेळ कैसा?
मग रुसण्याचे ढंग काही
फुलण्यास वेळ कैसा?
भाकरीचे तुकडे आता
थोडे-थोडे कमी होतात
चहापाण्याच्या गप्पाने तर
वेडे-वेडे होऊन जातात.
एकेकांच्या ओठीने तर
उपवासाचे दिस येती
त्याच उरलेल्या सवडीतुनी
प्रेमरसाचे गीत गाती.
– स्वामी बोबडे
पैठणकर