का कुणास ठाऊक मन माणसासारखं वागत नाही
मन मनाला समजवतं पण मन मात्र समजत नाही
का कुणास ठाऊक मन मनासारखं वागत नाही.
कधी वाटतं थोडं थांबावं
एकांताचा कुशीत पडावं
पण आवाज येतो आतून, तुला आता थांबायचं नाही
का कुणास ठाऊक मन मनासारखं वागत नाही.
पाऊल उठते नेहमी
काहीतरी धाडस करण्यासाठी
पण आवाज येतो आतून, हे काम तुझं नाही
का कुणास ठाऊक मन मनासारखं वागत नाही.
आवाज उठतो नेहमी
अन्यायाच्या विरोधात
पण आवाज येतो कानात, याच्याशी तुझा संबंध नाही
का कुणास ठाऊक मन मनासारखं वागत नाही.
गोंधळून जाते मन
वेगवेगळे विचार ऐकून
स्वतःचे विचार मात्र उजेडात कधी येत नाही
का कुणास ठाऊक मन मनासारखं वागत नाही.
मनानेच आपल्या कोंडून ठेवले स्वतःला,
कधी होईल सुटका याचा काही पत्ता नाही.
कारण…
का कुणास
ठाऊक मन मनासारखं वागत नाही.
— वैष्णवी गिरी
मूर्तिजापूर (अकोला)
Khup Chhan kavita ahe ..👍🏻