माझा बाप मेंढपाळ

काळ्या कभिन्न…
कणखर पाषाणागत
झिजतो भिजतो
माझा बाप मेंढपाळ
पैलतीर संसार उघडा
इडा पिडा जंजाळ
वनवनीत मेंढरांच्या
हिंडतो रानोमाळ
आज इथं, उद्या तिथं
कुठे हा परवा?
आदत जन्माची
पोषित घाम गारवा
तळाला पुढल्या
करीत कुच
वाडा फक्त मिरवा
हाकीत मेंढरं
धडा साऱ्या जीवनाचा गिरवा
नाही विसावा तीळभर
भल्या काडीचा
साधला डाव जरी
नभाने दुःखारी झडीचा
कल्लोळ लांडग्यांचा
मामला असला झाडीचा
नयनांस ना पापणी
शीण गोंदू या घडीचा
फिकीर ना कधी?
कुण्या भेडक भयांची व्यास
झेलीत घडी
ऊन वाऱ्यांना पाऊस
देहाला अंगारा देई
उभं धरणीची कूस
अन पांघरून होई
हे निळवर्णी आकाश

 

– बानासुत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top