मन

 

हे मन पण कीती विचित्र असते,

एक क्षण इकडे नंतर पलीकडे रमते ।।

कधी ते उगाचच मार्गदर्शक बनते,

नको त्या विचारात बुध्दीस अडकवते ।।

असेच कधी गप्पा मारत चिडवत बसते,

ती कोण आहे ? तो कोण ? या प्रश्नांत फसवते ।।

कधी ते अचानकच बावरं होते,

एकाच नावाच्या स्वराने हृद‌यात गाणं गाते ।।

कधी ते खूपच शांत होऊन राहते,

बुध्दीसोबत बसून अविस्मरणीय क्षणं आठवते ।।

हे मन पण किती विचित्र असते,

कधी कल्पनेत तर कधी आठवणींत सापडते ।।

 

– स्वराली संते 

1 thought on “मन”

  1. Khup chhan kavita ahe 👍🏻 ani aplya sobat pan nehami asach kahi ghadat asate yachi janiv karun dete….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top