आठवणी

न सांगता मला तिचं हसणं आठवलं,

न बघता मला तिचं रुसणं आठवलं.

कसं विसरू मी तिच्या आठवणी,

नसताना तिचं मला असणं आठवलं.

आरशात बघता तो एक चेहरा मला आठवला,

पुन्हा त्याच चेहऱ्याच्या आठवणी मनात आठवल्या.

कसं विसरू मी तिच्या आठवणींचे ते दिवस,

त्या दिवसांमधला एक शनिवार मला आठवला.

हृदयातल्या प्रत्येक कोपऱ्यात ती आहे, हे मला आठवलं,

माझ्या कवितेच्या लेखणीत ती आहे, हे मला आठवलं.

माझ्या पेनाच्या शाईत ती आहे, हे मला आठवलं.

खूप आधीच निघून गेली ती माझ्या आयुष्यातून,

तरीही या कवितेत चेहरा मला तिचाच आठवला…!

 

निलेश थाटकर

भ्रमणध्वनी: 8668835324

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top