एक होता भालू
नाव त्याचं कालू,
तो होता गोलमटोल
चालताना त्याचा जाई तोल!
पोट होतं मोठं
नाक त्याचं छोटं,
शेपटी त्याची छोटी
आवडत्या मधासाठी धडपड मोठी!
जंगलातला भालू
घरी खेळायला आला,
मऊ मऊ कापसाचा
बाहुला झाला!
आमची त्याची जमली गट्टी
आम्ही नाही घेत कधी त्याच्याशी कट्टी!
आमचा टेडू भल्ला भारी
लहान मोठ्यांना आवडते स्वारी!