अण्वस्त्र

चिमण्या पाखरांनो…!

अजूनही तुमच्यावर

अन्याय, अत्याचार होत असेल

तर-

घरट्यात लपून न राहता

तुम्हीही शिकावं

वैऱ्याशी दोन हात करण्याचं धाडस

‘काय म्हणालात’?

आमच्याजवळ शस्त्र नाहीत!

तुम्हाला शस्त्राची काय गरज

तुमच्या घरट्याची ‘एक काडी’

‘अण्वस्त्रा’सारखं शस्त्र बनू शकते.

पण-

त्यासाठी तुम्हाला

प्रज्ञासूर्याची शपथ घ्यावी लागेल

संघटित होऊन संघर्ष करण्याची.

संपादकीय मंडळ सदस्य - सुभाष पुंडलिक डहाणे

सुभाष पुं. डहाणे

माळसेलू (वाशिम)

2 thoughts on “अण्वस्त्र”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top