मी एक स्त्री आहे,
हे मला माहित आहे,
माहित आहेत, मला नियम.
माहित आहेत मला मर्यादा,
पण समाजात आहे,
सर्वत्र स्त्री-पुरुष समानता.
‘समानता’ हा शब्द सर्वत्र आहे खोटा कारण आजही घरात नवराच आहे मोठा.
ठामपणे पुरुष त्याची कुटुंबातील भूमिका सांगून जातो,
जातो जरी घराबाहेर तरी आम्हालाच सांगावी लागते घरी परत येण्याची त्यांना वेळ
स्त्री स्वतंत्र आहे हे फक्त शब्दांपुरते मर्यादित आहे.
कारण आम्हाला पायातील बेड्यांची सवय झाली आहे.
जरी आज बेडी या समाजातील लोकांना दिसत नाही, पण त्या बेडीचा ‘आभास’ आमच्या मनात आहे.
लग्नाआधी वडिलांची बेडी
मोठं झाल्यावर भावाची बेडी
लग्नानंतर नवऱ्याची बेडी
वृद्धापकाळात मुलाची बेडी
या सर्वांच्या बेडीतून तुझी सुटका नाही.
नाही तू स्वतंत्र,
नाही तू बिनधास्त,
अगं ते वेडे तुला होतो
या बेडीचा त्रास
या बेडीचा त्रास.
या बेडीचा त्रास.
– कांचन मिसाळ(तिडके
मूर्तिजापूर (अकोला)
रोख ठोक मांडणी मना मनातील भावना व्यक्त केली.. लिहीत राहा..
धन्यवाद सर
खूप छान.
वास्तव परिस्थिती मांडली खूप छान