बा भीमा आजही तू……

काही तरी मनातलं जे कवितेत उतरवलं, 

बा भीमा आजही तू जाती मधे वाटला गेला.

तू कधी कोणाचा तिरस्कार केला नाही.
कधी कोणाचा भेद भाव केला नाही.
तुला जमेल तेवढं तू सर्वांसाठी करून गेला.
तरी सुद्धा आज तू जाती मधे वाटला गेला.
सर्वांना वाटतो हा बौद्ध समाजाचा सण.
कोणाला समजलच नाही तुझं मन.
आजच्या युगामध्ये स्टेटस, स्टोरी ठेवून केलं तुला अभिवादन.
पण आजही तू मोचक्याच जणाच्या स्टेटसला दिसला.

बा भीमा आजही तू जाती मधे वाटला गेला.
जरी तुम्ही आज मावळला तरी तुमचा इतिहास दळवळत राहिला..
बा भीमा तू सर्वांना कळला. पण कुठं तरी जाती मधे वाटला गेला….
आज तू निजला.
पण तू सर्वांसाठी झिजला.

I will always be proud of you.

I will always be proud of you.
You said, humanity is the greatest religion.

– ज्योत्स्ना खांडेकर 

मूर्तिजापूर (अकोला)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top